
प्रतिनिधी – सोलापूर
श्री बृहन्मठ होटगी संस्था संचलित वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील अॅबकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेचे एकूण १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारांत सहभागी झालेल्या सर्व १२ विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
ऑनलाइन परीक्षेत कु. श्रद्धा फलमारी, कु. हर्षिता दासी, कु. श्रद्धा हिटनळी, कु. वेदांशी हलकट्टी, चि. अखिल मादास, चि. वरुण येवले आणि चि. तरुण गड्डम यांनी यश संपादन केले. तर ऑफलाइन परीक्षेत कु. अमुल्या वासी, कु. कामोजी आराध्या, कु. महेश्वरी जाधव, चि. साईचरण रासकोंडा आणि चि. प्रतीक गाजुल यांनी बक्षिसे मिळवली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी कंदिकटला यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करून आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करावी, असे आवाहन मुख्याध्यापिकांनी केले.
या यशाबद्दल काशी पीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले. संस्थेचे सचिव श्री. एस. जी. स्वामी आणि संचालक श्री. शशिकांत रामपूरे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना अॅबकसच्या मुख्य संचालिका तृप्ती नरेश बाचल (नागणे) आणि निलवानी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. लावण्या कुरापाटी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
सर्व १२ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















