स्वराज्य माहिती अधिकार संघटनेची शहर पोलीस आयुक्तांकडे मागणी; ग्रामीण प्रवासी आणि भाविकांना दिलासा देण्याचे आवाहन.

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील प्रमुख बस थांबे आणि रेल्वे स्थानक परिसरात भुरट्या चोरांचा उपद्रव वाढत असल्याचा आरोप करत, या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शहर पोलीस आयुक्त श्री. राव यांना निवेदन देण्यात आले.
सोलापूर शहरातील मुख्य बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरातील बस थांबा, विजापूर रोड, रंगभवन, अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी परिसरातील बस थांबा तसेच अन्य प्रवासी थांब्यांवर सोने, पैशांची पाकिटे आणि मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांसह भाविकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवून चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे आणि विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्रीताई उत्पात यांच्या आदेशानुसार, तसेच विश्वस्त व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी विश्वस्त उमेश काशिकर, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा प्रभारी अमर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक कुरुलकर, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, अक्कलकोट शहराध्यक्षा मीराबाई बुद्रुक, उपाध्यक्ष हर्षद पंडित, जिल्हा सरचिटणीस दत्तगुरू वेदपाठक, सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष पोतदार, मल्लिनाथ जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमुख बस थांब्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















