ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन; मान्यवरांनी व्यक्त केल्या शुभेच्छा…

सोलापूर : प्रतिनिधी
ॲड. भीमाबाई निंगाप्पा गायकवाड यांच्या कार्यालयासह ‘दिक्षिता ऑनलाईन अँड टायपिंग सेंटर’चे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंदजी थोबडे यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. भीमाबाई गायकवाड यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कायदेविषयक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे म्हणाले की, ॲड. भीमाबाई गायकवाड या उच्चशिक्षित असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून गोरगरीब व अन्यायग्रस्तांना आर्थिक अपेक्षा न ठेवता न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. वकिली व्यवसाय हा संघर्षाचा असून, यशस्वी वकील बनण्यासाठी कठोर परिश्रम, एकाग्रता आणि प्रामाणिकपणा या गुणांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिका नसीमा पठाण यांनी व्यक्त केला अभिमान
ज्येष्ठ साहित्यिका तथा संभाजी बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या नसीमा पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ॲड. भीमाबाई गायकवाड या त्यांच्या बी.एड.च्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी एलएल.बी.सोबतच तीन विषयांत एम.ए. आणि एम.एड.चे शिक्षण पूर्ण केले असून, प्राध्यापिका म्हणूनही सेवा बजावली आहे. विद्यार्थिनीच्या यशस्वी वाटचालीचा अभिमान असल्याचे सांगताना त्या भावूक झाल्या.
भीमाबाई यांनी गरिबी आणि अनेक संकटांचा सामना करत सामाजिक कार्य सुरू ठेवले. त्यांनी धनदौलतीपेक्षा माणसे कमावली असून, त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि सेवाभावी वृत्तीचे फळ आज मिळत असल्याचे पठाण यांनी नमूद केले.



‘भीमाची लेक’ अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर : मच्छिंद्र भोसले


अखिल भारतीय भटके-विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी ॲड. भीमाबाई गायकवाड यांचा गेल्या १२ वर्षांतील संघर्ष जवळून पाहिल्याचे सांगितले. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत कायद्याचे शिक्षण घेऊन त्या स्वाभिमानाने समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले.ॲड. भीमाबाई या वकिली व्यवसायासोबतच दलित पँथरच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. भटके-विमुक्त जाती-जमातींच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे. आर्थिक अडचणी असूनही सामाजिक कार्यातील त्यांचा उत्साह कधीही कमी झालेला नाही. त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती त्यांना भविष्यात मोठ्या पदावर घेऊन जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भविष्यात न्यायाधीश होण्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षण, सामाजिक कार्य आणि कायद्याच्या माध्यमातून न्यायासाठी लढा
प्रा. बसवंत गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि मान्यवरांच्या सहकार्यामुळे भीमाबाई यांनी एम.ए., एम.एड. आणि एलएल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सोलापुरातील हॉटेल निसर्ग या ठिकाणी कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद…


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अनुसूचित जाती तसेच भटके-विमुक्त समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलने केली. आता वकिलीच्या माध्यमातून वंचित आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या अधिक प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दलित पँथरच्या जिल्हा महिला अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या त्या प्रामाणिकपणे पार पाडतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य सभापती सुनील बापू खटके, अक्कलकोटचे माजी सभापती संजीव पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भारत कट्टे, ॲड. शिवकैलास झुरळे, ॲड. उमेश मराठे, सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. परमानंद जवळकोटे, सचिव ॲड. जयप्रकाश भंडारे, खजिनदार ॲड. चंद्रसेन गायकवाड, ॲड. शताब्दीकुमार दोडयानुर, माजी सभापती विलास गव्हाणे, प्रा. बसवंत गायकवाड, ॲड. वैशाली बोराडे, ॲड. शितल गोसावी, ऋतुपूर्णताई फुलारी, ॲड. शुभम माने, ॲड. प्रकाश सोनार, ॲड. अर्चना विधाते, ॲड. तुषार ताकभाते, ॲड. मनीषा शिंदे, ॲड. निलेश सोनवणे, ॲड. चिदानंद सुटे, ॲड. मयूर बनसोडे, ॲड. भगवान बांगर, ॲड. एजाज शेख, प्रा. कलशेट्टी, यशवंत फडतरे, कीर्तीपाल शिवशरण, पंडित अरवत, लालकोट (भैय्या), सिद्धाराम घटकांबळे, लक्ष्मण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुस्ताक लालकोट यांनी परिश्रम घेतले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















