
प्रतिनिधी – सोलापूर
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगडगाव, शिरवळ (जै.) आणि होटगी येथून मागील चार महिन्यांत चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली शोधून हस्तगत करण्यात वळसंग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी करमाळा, पुणे जिल्हा तसेच कर्नाटकातील बेंगळुरू येथे तपास करून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकली संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आल्या आहेत.
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तपास अधिकारी पोलीस हवालदार श्रीशैल माळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर बेंगळुरू येथे जाऊन आरोपींना अटक करत चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईमुळे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार श्रीशैल माळी, विकास क्षिरसागर तसेच पोलीस नाईक संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल महेश कुंभार आणि प्रसाद मांढरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















