Monday, November 23, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

मंद्रुपमध्ये जागेच्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ; दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 29, 2026
in solapur`
0
मंद्रुपमध्ये जागेच्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ; दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा.
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुऱ्हाडीने कापून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; मंद्रुप पोलिसांत गुन्हा दाखल…

प्रतिनिधी- मंद्रुप

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे जागेच्या मालकीवरून झालेल्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने कापून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवि महादेव म्हेत्रे या दोघा भावांविरुद्ध मंद्रुप पोलिसांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आडवेप्पा कांबळे (वय ३३, रा. मंद्रुप) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंद्रुप येथील बाजार चौक परिसरात रस्त्यालगत असलेली जागा फिर्यादीचे आजोबा मल्लप्पा येगप्पा कांबळे यांच्या नावावर होती. वारसा हक्काने ही जागा फिर्यादीचे वडील व काका यांच्या नावावर असून, ग्रामपंचायतीच्या नोंदीत या मिळकतीचा क्रमांक १५७३ असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

१५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रवींद्र कांबळे हे आपल्या काका व चुलत भावासोबत संबंधित जागेची साफसफाई करत होते. त्यावेळी वाघेश म्हेत्रे आणि रवि म्हेत्रे हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. संबंधित जागा आपली असल्याचे सांगत त्यांनी साफसफाई करण्यास विरोध केला. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

जागेच्या वादादरम्यान आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांची जात माहीत असतानाही जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमानास्पद शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच कुऱ्हाडीने कापून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर रवींद्र कांबळे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करीत आहेत.

जागेच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादाला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीचे स्वरूप प्राप्त झाल्याने या घटनेची मंद्रुप परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून, संबंधितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

उमेद अभियानांतर्गत २ व ३ नोव्हेंबरला सोलापूरमध्ये ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव’; २५ बचत गटांचे स्टॉल.

Next Post

सोलापूरमध्ये ९६.९१ किलो गांजा जप्त; ४८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत -गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तरुणासह महिलेला अटक, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सोलापूरमध्ये ९६.९१ किलो गांजा जप्त; ४८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत -गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तरुणासह महिलेला अटक, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी.

सोलापूरमध्ये ९६.९१ किलो गांजा जप्त; ४८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत -गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तरुणासह महिलेला अटक, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045779

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697