Sunday, November 22, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा; शहाजी पवारांचा पुढाकार.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 30, 2026
in solapur`
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा; शहाजी पवारांचा पुढाकार.
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमेदवारी अर्ज दाखल; लाखो रुपयांचा निवडणूक खर्च वाचविण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहन.

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बँकेचा लाखो रुपयांचा निवडणूक खर्च वाचावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शहाजी पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

भाजपच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याची इच्छा

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहाजी पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी काळात पक्षाचे पदाधिकारी आणि पॅनल जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. पक्षाच्या निर्णयाला आपले पूर्ण समर्थन राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीवरील खर्च शेतकरीहितासाठी वापरा!

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँकेवर निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करून तो पैसा शेतकरीहिताच्या कामांसाठी वापरणे अधिक योग्य ठरेल, अशी भूमिका शहाजी पवार यांनी मांडली.

न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडत असली, तरी सर्व संबंधितांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रातील एकजुटीची अपेक्षा

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडणाऱ्या शहाजी पवार यांच्या आवाहनाला सहकार क्षेत्रातील अन्य घटक आणि राजकीय पक्ष कसा प्रतिसाद देतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

सोलापूरमध्ये ९६.९१ किलो गांजा जप्त; ४८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत -गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तरुणासह महिलेला अटक, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी.

Next Post

‘देऊळ बंद’ फेम प्रवीण तरडे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांच्या हस्ते सिनेकलावंत प्रवीण तरडे यांचा सत्कार.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
‘देऊळ बंद’ फेम प्रवीण तरडे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांच्या हस्ते सिनेकलावंत प्रवीण तरडे यांचा सत्कार.

‘देऊळ बंद’ फेम प्रवीण तरडे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांच्या हस्ते सिनेकलावंत प्रवीण तरडे यांचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045775

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697