
प्रतिनिधी – अक्कलकोट
प्रसिद्ध सिनेकलावंत, लेखक व दिग्दर्शक तसेच ‘देऊळ बंद’ चित्रपटामुळे विशेष ओळख निर्माण केलेले प्रवीण तरडे यांनी शुक्रवारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट येथे भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते प्रवीण तरडे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, स्वामींची प्रतिमा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रवीण तरडे म्हणाले की, मी आजवर अनेक चित्रपट केले. ‘देऊळ बंद’सारखा विषयही हाताळला; मात्र अक्कलकोटला आल्यानंतर खऱ्या अर्थाने देव काय असतो, याची अनुभूती येते. येथे कोणताही बडेजाव नाही, तर केवळ स्वामी आहेत आणि त्यांची सेवा आहे.

देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांचे विशेष कौतुक करताना ते म्हणाले की, इंगळे हे स्वतःला चेअरमन न समजता स्वामींचा सेवेकरी समजतात. मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि भाविकांना दिला जाणारा मान-सन्मान पाहून मंदिर खऱ्या अर्थाने एका भक्ताच्या हातात असल्याची भावना निर्माण होते.
अक्कलकोटमधून आपण एक वेगळी ऊर्जा घेऊन जात असून, आगामी चित्रपटासाठी स्वामींचा आशीर्वाद निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा स्वामींचा कानमंत्र घेऊन आपण येथून परत जात असल्याचे सांगत त्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ असा जयघोष केला.यावेळी नवनाथ बनकर, चिन्मय फुले, प्रथमेश मालक इंगळे, श्रीकांत मलवे आदी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















