‘मदतीचे धोरण, हेच शिवसेनेचे तोरण’; एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड

प्रतिनिधी – माळशिरस
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा आधार देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला. शिवसेना भवन, नातेपुते येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते १ हजार शेतकरी महिलांना करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड होण्यास मदत झाली.

यावेळी बोलताना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खासदार झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी दुष्काळाच्या छायेत आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार यंदाची दिवाळी घरात साजरी न करता शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतमजुरांसोबत आणि बळीराजाच्या सान्निध्यात साजरी करण्याचा संकल्प केला आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हजारो ट्रकच्या माध्यमातून आनंदाचा शिधा पाठविण्यात आला आहे. ‘मदतीचे धोरण, हेच शिवसेनेचे तोरण’ या भूमिकेतून शिवसेना बळीराजाच्या बांधावर पोहोचत आहे. राज्याच्या दौऱ्यादरम्यान माळशिरस तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहिली. महिलांच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजी दिसत होती. मात्र, एकनाथ शिंदे साहेबांचे नाव घेताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. यावरून लाडक्या बहिणींचा आपल्या लाडक्या भावावर किती विश्वास आहे, हे दिसून येते. त्यांच्याच माध्यमातून आलेला आनंदाचा शिधा महिलांच्या हातात देताना मनापासून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकुमार हिवरकर पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करीत आहे. माळशिरस तालुक्यातील ५५ गावांमधील शेतकरी महिलांना एकत्रित आणून आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांना मिळालेला शिधा त्या आपल्या लेकराबाळांसाठी घरी घेऊन जातील आणि त्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड होईल. संकट मोठे असले तरी एकनाथ शिंदे साहेबांचा आणि शिवसैनिकांचा हात शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सोलापूरचे नगरसेवक प्रदर्शन साठे, ज्येष्ठ नेते शंकरराव हिवरकर पाटील, भीमराव भुसणार, तानाजीराव भोळे, दादासाहेब लोखंडे, भाजपचे युवा नेते मनोज जाधव, तेजस गोरे, सुनील बनकर, चेअरमन रंजीत जठार, लालासाहेब मोटे, दत्ताभाऊ गोरे, संग्राम हिवरकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
एक हजार शेतकरी महिलांना आनंदाचा शिधा वाटप करून दुष्काळाच्या संकटात त्यांच्या कुटुंबांना दिवाळीच्या सणासाठी मदतीचा हात देण्यात आला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















