तडवळ येथे शेतकरी संवाद मेळावा; शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांशी साधणार थेट संवाद…

प्रतिनिधी – अक्कलकोट
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित राजेंद्र पवार हे उद्या अक्कलकोट शहर व तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळी परिस्थिती, पाणीप्रश्न, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, वीजपुरवठा, विद्यार्थी, कामगार, रोजगार तसेच उजनी धरण परिसरातील नियोजित प्रकल्पासंदर्भातील प्रश्न जाणून घेणार आहेत. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश सुरवसे यांनी दिली.
या दौऱ्यात आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रशांत बाबर, युवा नेते ओम कत्ते, शिवसेनेचे शहरप्रमुख राम जाधव, तालुकाप्रमुख रवी डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गंगाधर मोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम
आमदार रोहित पवार हे सकाळी ७.१५ वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेणार असून मंदिर परिसरात शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर जेऊर येथे शेतकरी व कष्टकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. पुढे करजगी परिसरातील शेतशिवारात जाऊन पीकपाहणी करणार आहेत.
असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम
आमदार रोहित पवार हे सकाळी ७.१५ वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेणार असून मंदिर परिसरात शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर जेऊर येथे शेतकरी व कष्टकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. पुढे करजगी परिसरातील शेतशिवारात जाऊन पीकपाहणी करणार आहेत.
त्यानंतर सकाळी १० वाजता तडवळ येथील जयशंकर प्रशालेत सिद्रामप्पा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संजीवकुमार पाटील, रमेश पाटील, शिवानंद पाटील, आनंद तानवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्याच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेती, पशुधन, वीज, शिक्षण, रोजगार आणि उजनी धरणावरील नियोजित प्रकल्पासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या व सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















