Saturday, November 21, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने दीपावलीचा आनंद द्विगुणित – सभापती मोनिका सूर्यवंशी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 7, 2026
in solapur`
0
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने दीपावलीचा आनंद द्विगुणित – सभापती मोनिका सूर्यवंशी.
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रेणापूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका सूर्यवंशी यांनी घेतले श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शन; चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी – अक्कलकोट

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला मोठी शांती आणि प्रसन्नता लाभली. स्वामींच्या दर्शनाने दीपावलीचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना लातूर जिल्ह्यातील रेणापूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका रवि सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

दीपावलीचे औचित्य साधून सभापती मोनिका रवि सूर्यवंशी यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला भेट देत श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन त्यांचा भक्तिभावाने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मोनिका सूर्यवंशी म्हणाल्या की, श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनाला वेगळीच शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. स्वामींचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो. अक्कलकोट नगरीसह संपूर्ण तालुक्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी केली.

देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी केलेल्या प्रेमळ सत्काराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुरू असलेली सेवा आणि धार्मिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष पराणे, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

मंद्रूप आठवडा बाजारात DYSP गणेश शिंदे यांची अचानक पाहणी; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई!

Next Post

रोहित पवार यांचा उद्या अक्कलकोट तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
रोहित पवार यांचा उद्या अक्कलकोट तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा!

रोहित पवार यांचा उद्या अक्कलकोट तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आज...

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन; कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील व हार्डवेअर साहित्याची सुविधा करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील...

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

by Janta Sangharsh News
November 11, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील तब्बल ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या...

Load More

वेबसाईट दर्शक

0044985

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697