
प्रतिनिधी -सोलापूर
देवांग (विणकर) समाजाच्या सर्वोच्च नेत्या, मागासवर्गीय समाजाच्या आशास्थान आणि विणकर समाजाच्या रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. उमाश्री यांची कर्नाटक विधान परिषदेच्या माननीय उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल SRC प्रतिष्ठान – “झाडे लावा, झाडे जगवा” परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले की, डॉ. उमाश्री यांची ही निवड देवंग (विणकर) समाजासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे समाजाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असून, त्यांच्या कार्याचा लाभ सर्वसामान्यांसह मागासवर्गीय समाजालाही होत आहे.यापुढील काळातही त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली समाजाचा सर्वांगीण विकास, प्रगती आणि सशक्तीकरण अधिक वेगाने घडत राहो, तसेच समाजहिताची अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून साकार होवोत, अशा शुभेच्छा SRC प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.














