Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहाची सोलापुरात सुरुवात; सर्वोपचार रुग्णालयात जनजागृतीसह माता-बालकांना साहित्य वाटप.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 5, 2026
in solapur`
0
आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहाची सोलापुरात सुरुवात; सर्वोपचार रुग्णालयात जनजागृतीसह माता-बालकांना साहित्य वाटप.
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर,

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने बाह्यरुग्ण विभागात जनजागृती कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन, रोल-प्ले आणि माता-बालकांना साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात परिचारिकांच्या आद्यदेवता फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. जयकर यांनी स्तनपान ही केवळ मातेची जबाबदारी नसून प्रत्येक मातेला आवश्यक आधार, प्रोत्साहन आणि योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही आरोग्य यंत्रणा व समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षकवृंद आणि प्रशिक्षणार्थींच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

बालरोग विभागप्रमुख डॉ. सुधीर सरवदे यांनी स्तनपान हे नवजात बालकासाठी सर्वोत्तम आणि संपूर्ण पोषण असल्याचे सांगितले. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान देणे तसेच अनावश्यक फॉर्म्युला फीडिंग टाळण्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी परिचारिका प्रशिक्षणार्थींनी बाह्यरुग्ण विभागात माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन भरविले. तसेच प्रसूतीपश्चात कक्षात रोल-प्लेच्या माध्यमातून योग्य स्तनपान तंत्र, मातेचा आहार, स्तनपानाचे फायदे, गैरसमजांचे निरसन आणि माता-बालकांच्या आरोग्याविषयी उपस्थित माता व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रभावी जनजागृती केली.कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, बालरोग विभागप्रमुख डॉ. सुधीर सरवदे, अधिसेविका श्रीमती कविता ढगे, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा शिंदे, शिक्षकवृंद, अधिपरिचारिका, परिसेविका, प्रसूतीपश्चात माता व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवजात बालकांना कपडे तसेच मातांना खाऊचे वाटप करण्यात आले. सुरक्षित मातृत्व, माता-बाल संगोपन आणि कुटुंब-केंद्रित आरोग्यसेवेप्रती संस्थेची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. मनीषा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षकवृंद व प्रशिक्षणार्थींनी केले.

Previous Post

जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे दिमाखदार उद्घाटन.

Next Post

दृष्टी नसली तरी जिद्दीला मर्यादा नाही; दिव्यांग विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाने सर्वांनाच केले अचंबित.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
दृष्टी नसली तरी जिद्दीला मर्यादा नाही; दिव्यांग विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाने सर्वांनाच केले अचंबित.

दृष्टी नसली तरी जिद्दीला मर्यादा नाही; दिव्यांग विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाने सर्वांनाच केले अचंबित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022730

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697