Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 8, 2026
in Crime, solapur`
0
सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर

येथील चतुर्थ सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयाने भिडे यांनी भाडेकरू कार्यकर्ते यांच्याविरोधात दाखल केलेला जागेच्या ताब्याचा दावा (नियमित दिवाणी दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यायालयाने सर्व मुद्दे प्रतिवादी कार्यकर्ते यांच्या बाजूने स्पष्ट करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:

वादी भिडे (रा. , भिडे कॉलनी, सोलापूर) यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये प्रतिवादी कार्यकर्ते यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. वादीचे म्हणणे होते की, सी-ब्लॉक मधील गाळा क्र. सी-६ आणि बी-ब्लॉक मधील खोल्यांची इमारत अत्यंत जुनी व धोकादायक झाली असून सोलापूर महापालिकेने ती पाडण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नवीन बांधकामासाठी जागेचा ताबा हवा आहे, तसेच प्रतिवादीने तेथे पक्के बांधकाम केले आहे असा आरोप वादीने केला होता.

प्रतिवादीची बाजू व न्यायालयाचा निष्कर्ष:

प्रतिवादी कार्यकर्ते यांच्या वतीने ॲड. श्रीनीवास कटकूर यांनी बाजू मांडली प्रतिवादींच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले की:

* इमारतीमध्ये कोणतेही बेकायदेशीर किंवा पक्के बांधकाम केलेले नाही.

 * वादीने दावा केलेली जागेची अत्यंत गरज (Bonafide Requirement) सिद्ध केलेली नाही, 

कारण वादी स्वतः पुण्यात राहतात.

 * महापालिकेने इमारत धोकादायक ठरवून कोणतीही प्रत्यक्ष कारवाई केलेली नाही किंवा खात्रीशीर स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट न्यायालयात सादर केलेला नाही.

* प्रतिवादी नियमितपणे मासिक भाडे (रु. १,६७०/-) भरत आले आहेत आणि त्यांच्याकडे राहण्यासाठी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

न्यायालयाने नमूद केले की, जर जागेचा ताबा वादीला दिला तर प्रतिवादी कार्यकर्ते यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.

न्यायालयाचा अंतिम निकाल:

मे. न्यायालयाने प्रतिवादीची बाजू ग्राह्य धरून भिडे यांचा ताबा व नुकसान भरपाईचा दावा सखर्च फेटाळला (Dismissed with costs) आहे.

प्रकरणाचा संक्षिप्त तपशील:

* न्यायालय: ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, सोलापूर 

 * दावा .: नियमित दिवाणी दावा 

 * वादी: भिडे

 * प्रतिवादी: कार्यकर्ते

* प्रतिवादींचे वकील: ॲड. श्रीनीवास. कटकूर व adv. आकाश आयंची

(प्रतिवादी – कार्यकर्ते)

रा. सी-ब्लॉक, सी-६, भिडे कॉलनी, सोलापूर.

Previous Post

सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.

Next Post

मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स; ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळात उत्तुंग झेप!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स; ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळात उत्तुंग झेप!

मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स; ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळात उत्तुंग झेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे...

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर  नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा...

Load More

वेबसाईट दर्शक

0007140

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697