
प्रतिनिधी -सोलापूर,
बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वाभिमानी RG_COMPANY यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त करंजकर माध्यमिक विद्यालय, सोलापूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी हा सामाजिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले भविष्य घडवावे, असा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पिंटुजी (आप्पासाहेब) ढावरे, प्रभाकर काशीद (पैलवान), प्रताप (नेता) ढावरे, अजय (भाऊ) खंडागळे, प्रदीप गायकवाड, शशिकांत डोलारे, महेश भालेराव, विशाल गायकवाड उपस्थित होते.तसेच संस्थापक मिथुन (दिगंबर) वाघमारे, उत्सवाध्यक्ष रोशन कांबळे यांच्यासह राहुल भालेराव, राजा (भाऊ) चव्हाण, दीपक कोप्पुल, अमित कांबळे, संकेत शिंदे, अक्षय वाघमारे, अतिश रणदिवे, राहुल देवरमनी, विजय भंडारे, साहिल क्षीरसागर, चैतन्य गायकवाड, कपिल वाघमारे, जीवन गायकवाड, सायबा नागटिळक, धीरज भालेराव, अतिश उबाळे, राहुल साबळे, विशाल जावळे, अक्षय कुचेकर, सचिन महापुरे, मंगेश आठवले, धम्मप्रिय शिरोळे, अभिषेक घोडके, संगप्रिय शिरोळे, सुनील वाघमारे, रोहन मंदारकर, इरफान शेख, सोनू रणदिवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी तसेच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर /बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क–9579838340
















