
प्रतिनिधी =अक्कलकोट, दि. ९ ऑगस्ट २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव प्रकल्प मंडळाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व श्रेय श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे तसेच गुरुमाऊली महेश इंगळे आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाला आहे. स्वामींच्या आशीर्वादामुळे काम करण्यास नवी ऊर्जा व बळ मिळते, असे मनोगत जिगांव प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांनी व्यक्त केले.
अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांनी नुकतीच सहकुटुंब श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी श्रीराम हजारे, देवयानी श्रीराम हजारे, चिन्मय हजारे व हर्षवर्धन हजारे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी श्रीराम हजारे यांनी स्वामींच्या दर्शनाने व सत्कारामुळे मनाला समाधान मिळाल्याचे सांगत, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी दिनकर वीर, दिनकर पाटील, पंडित, मधुसूदन मांडुरे, बाबुराव माने-देशमुख, रमेश शिंदे सर, सागर गोंडाळ, विपुल जाधव आदी उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर/बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















