प्रतिनिधी – सोलापूर,
जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अप्पासाहेब लंगोटे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी मा. अप्पासाहेब लंगोटे यांचा शाल, मानाची टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहितासाठीच्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला. तसेच त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
हा सत्कार सोहळा विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार बांधव, सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी, आरटीआय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमास नितीन करजोळे, लतीफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, डी. डी. पांढरे, गिरमल्ला गुरव, अस्लम नदाफ, अशोक ढोणे, अनिल शिराळकर, दत्ता पवार, अक्षय बबलाद, यशवंत पवार, डॉ. राम हुंडारे, अंबादास गंज्जम, अमोल कुलकर्णी, सिद्धार्थ भंडकुबे, शिवय्या स्वामी, सिद्धाराम नंदरगी, ॲंड. जुबेर नागणसुरे, ॲंड विश्वभूषण कांबळे,नामदेव पवार, नागेश पासकंटी, दशरथ काळे, राजू बेळ्ळेनव्हरू, अनिल बनसोडे, सिद्धाराम बिराजदार, जहिर नदाफ, राजू मोरे, अश्फाक शेख सर, विजयकुमार उघडे, प्रवीण पारवे, दयानंद बनसोडे सर, आंबा तळभंडारे, यशवंत फडतरे, विश्वनाथ व्हनकोरे, विजयकुमार जुंजा, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, संतोष धोत्रे, आर. डी. जाधव, गणेश जाधव, सुभाष गायकवाड, सचिन कांबळे, संतोष कांसे, सतीश धोत्रे, शांतीसागर सरवदे, वैभव धोत्रे, शाम कोळी, ओंकार धोत्रे, पप्पू गायकवाड, गणेश भालेराव,मुस्ताक सेतसंदी, इक्बाल शेख, सुधीर ढोळ्ळे, आदम मुलाणी, सोहेल जाहगिरदार, मोहन थळगे, अफजल शेख, सूरज राजपूत, भारत केदार, अश्फाक शेख, चैतन्य घोडके, अप्पू शेख, फिरोज पटेल, राजशेखर गावडे, मुदोतसर दिवान, मौलाली शेख, साबिर शेख, साजिद मकानदार, निसार उस्ताद, श्रीनिवास बनसोडे, विशाल कांबळे, नरेंद्र संब्बन, मोईन शेख, पटेल सर, रवी बनसोडे, राजू गायकवाड, अमोल काळे, राहुल गायकवाड, रोहित घोडके, जोशी काका , संगिता ताई बिराजदार, यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
संपूर्ण सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. उपस्थित पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि अप्पाश्री मित्र परिवाराच्या सदस्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















