
प्रतिनिधी – अक्कलकोट
भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील सर्व जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली.

दर्शनानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा स्वामींची शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राम कदम म्हणाले की, “स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे लाखमोलाचे आहेत. स्वामींच्या शिकवणीतूनच आपल्याला सेवा आणि त्यागाची प्रेरणा मिळते. अक्कलकोट हे भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र असून येथे येऊन मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळते.”
यावेळी मंदिराचे पुरोहित मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, आदित्य गवंडी यांच्यासह पदाधिकारी व भक्त उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















