
प्रतिनिधी – सोलापूर
माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एन.ए.बी. संचलित ममता मूकबधिर विद्यालय (निवासी) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एन.ए.बी. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
३ सप्टेंबर रोजी विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, हस्तकला स्पर्धा आणि ओष्ठवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी निसर्गप्रेमी संघटनेच्या अध्यक्षा सरोज बच्चूवार मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सरोज बच्चूवार यांनी अशा उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गायकवाड यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात येणार असून, विविध समाजोपयोगी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















