
प्रतिनिधी – सोलापूर,
ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढविणे, ग्रामीण आजीविका अधिक सक्षम करणे, विकासकामांना गती देणे आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५’ (VB-GRAMG) या महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हास्तरीय पंच संमेलन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या संमेलनास सोलापूर जिल्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, कृषी व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामपा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाज कल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अंजली मरोड, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संमेलनादरम्यान VB-GRAMG अधिनियम, २०२५ मधील विविध तरतुदी, अभियानाची उद्दिष्टे, ग्रामीण भागातील रोजगाराची हमी, कामांचे प्रभावी नियोजन, ग्रामपंचायतींची भूमिका, लोकसहभाग तसेच ग्रामीण भागात शाश्वत व उपयुक्त मालमत्ता निर्मिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते यांनी ग्रामीण नागरिकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गावांच्या मूलभूत सुविधांचा विकास, आजीविका बळकटीकरण आणि स्थानिक पातळीवर विकासकामांचे प्रभावी नियोजन करण्यात यावे असे मार्गदर्शन केले. या संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यात विचारविनिमय करण्यात आला. रोजगारनिर्मिती, आजीविका वृद्धी, शाश्वत विकासकामे आणि सक्षम ग्रामव्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर होनमाने व प्रशांत ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन गट विकास अधिकारी रोहयो अरुण वाघमोडे यांनी केले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















