प्रतिनिधी- मुरूम
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्रीराम गणेश मंडळाची गणेशोत्सव २०२६ च्या नियोजनासाठी नुकतीच बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत मुरूम नगरपालिकेचे नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी पुष्पक कौलकर तर सचिवपदी अभिजित कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोनार गल्ली येथील श्रीराम गणेश मंडळाची बैठक माऊली भक्त आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी गणेशोत्सव २०२६ च्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.बैठकीत गणेशोत्सव हा सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि जनतेच्या सहभागातून साजरा करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मंडळाचे माजी अध्यक्ष सागर पोतदार, गोविंद कौलकर, सतीश वेदपाठक, राजू खुने, महादेव महामुनी, प्रवीण पंडित, निलेश महामुनी, अमोल वेदपाठक, अमित पोतदार, आशिष वेदपाठक, प्रसाद महामुनी, समर्थ कडगांचे, शिवराज बोळशेठ्ठे, गौरी बोगंरगे, सागर शिंदे, ईश्वर कडगांचे, किशोर महामुनी, राजू दीक्षित, योगेश पोतदार, संकेत पंडित, अप्पू कोळी, राहुल विभुते, रुद्र वेदपाठक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















