Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 7, 2026
in solapur`, Eductional
0
नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा.
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर 

येथील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या, ज्ञानाचा प्रकाश पसरविणाऱ्या आणि संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना समर्पित हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे साहित्यिक प्रा. शिवाजी शिंदे सर यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे, प्राचार्या रश्मी कुंभार, शाळेच्या समुपदेशिका डॉ. पद्मजा गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राचार्या रश्मी कुंभार यांनी शिक्षकी पेशाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवून त्यांना देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. शिवाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतातून का शिकवावे, काय शिकवावे आणि कसे शिकवावे याविषयी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारून शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळला. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, पर्यवेक्षक तसेच विविध विषयांचे शिक्षक बनून वर्गांमध्ये अध्यापन केले. शिक्षक म्हणून अध्यापनाचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि कार्याची प्रत्यक्ष जाणीव झाली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमारदादा करजगी व संस्थेच्या सचिवा सौ. वर्षाताई विभुते यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षभर विद्यार्थ्यांसाठी अविरत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काजल कुलकर्णी यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा आगळावेगळा उपक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Previous Post

श्रीराम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची निवडउ;पाध्यक्षपदी पुष्पक कौलकर तर सचिवपदी अभिजित कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.

Next Post

थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022699

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697