
प्रतिनिधी -सोलापूर
थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

जयंतीनिमित्त आयोजित या अभिवादन कार्यक्रमात भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या कार्यास उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- 9579838240















