प्रतिनिधी – सोलापूर

ऊसाचे थकीत बिल मिळावे, या मागणीसाठी एका शेतकऱ्याने सोलापुरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. संबंधित शेतकरी झाडावर चढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलनास बसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल तातडीने देण्यात यावे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्याने केली.
अनेक दिवसांपासून ऊसाचे बिल मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. संबंधित प्रशासनाने व साखर कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्याच्या मागणीची दखल घेऊन थकीत ऊस बिलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















