Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

गांधी जयंतीपर्यंत कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा-महांतेश्वर कट्टीमनी सर 

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 10, 2026
in Akkalkot
0
गांधी जयंतीपर्यंत कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा-महांतेश्वर कट्टीमनी सर 
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या कारभाराबाबत करण्यात आलेल्या विविध तक्रारींवर अद्याप कारवाई न झाल्याचा आरोप करत मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अक्कलकोट तालुका माजी अध्यक्ष महांतेश्वर हनुमंतराव कट्टीमनी यांनी येत्या 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीपर्यंत निर्णय न झाल्यास जिल्हा परिषद सोलापूर कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.याबाबत त्यांनी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून अधिकारांचा गैरवापर करून शिक्षकांच्या अनेक प्रतिनियुक्त्या करण्यात आल्याचा आरोपही कट्टीमनी यांनी केला आहे.

या प्रतिनियुक्त्यांबाबत सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशीचा अहवाल 16 जानेवारी 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, चौकशी अहवालानंतरही अद्याप संबंधित प्रकरणात ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.संबंधित फाईल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्याचा जावक क्रमांक 1916209 असून, दिनांक 4 ऑगस्ट 2025 असल्याचे कट्टीमनी यांनी म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही कारवाईबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.कट्टीमनी यांनी यापूर्वीही या प्रकरणाच्या निषेधार्थ अनेक वेळा उपोषण केले असून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. तसेच उपोषणादरम्यान प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याविरोधात काही महिला शिक्षकांच्या तक्रारी असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कथित वसुलीबाबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना ऐकविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व तक्रारी व पुरावे सादर करूनही संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा सवाल कट्टीमनी यांनी उपस्थित केला आहे.

“संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वारंवार तक्रारी, पुरावे आणि तब्बल 40 दिवसांचे उपोषण करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येत्या 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीपर्यंत या प्रकरणात योग्य निर्णय व कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद सोलापूर कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे,” असा इशारा महांतेश्वर हनुमंतराव कट्टीमनी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित प्रशासन व प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

मैंदर्गीतील अवैध वाळू साठ्याची चौकशी करण्याची मागणी; तक्रारीनंतरही कारवाई नसल्याचा आरोप- विश्वनाथ  इट्टेनवरू

Next Post

कॅन्सरग्रस्त राष्ट्रीय खो-खो पंच लखन कांबळे यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून दीड लाखांची आर्थिक मदत.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
कॅन्सरग्रस्त राष्ट्रीय खो-खो पंच लखन कांबळे यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून दीड लाखांची आर्थिक मदत.

कॅन्सरग्रस्त राष्ट्रीय खो-खो पंच लखन कांबळे यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून दीड लाखांची आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022696

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697