
प्रतिनिधी – सोलापूर
सांगोला येथील प्राथमिक शिक्षक तथा राष्ट्रीय खो-खो पंच लखन कांबळे हे मागील तीन महिन्यांपासून कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने लखन कांबळे यांना एक लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे सर तसेच दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष, राष्ट्रीय खो-खो पंच व जिल्हा खो-खो संघटनेचे खजिनदार श्रीरंग बनसोडे सर यांनी या मदतीसाठी विशेष पुढाकार घेतला. उत्तर सोलापूरचे गटशिक्षण अधिकारी मा. अवचील महाडिक साहेब यांच्या हस्ते लखन कांबळे यांना धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, शहर प्रमुख पवन कांबळे, दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष श्रीरंग बनसोडे, सचिव बाबुराव गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण बनसोडे तसेच बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत असलेल्या लखन कांबळे यांना शिक्षक संघटनेने दिलेली ही आर्थिक मदत निश्चितच दिलासादायक ठरणार असून, संघटनेच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















