
प्रतिनिधी- पंढरपूर
जिल्ह्यातील नवोदित गायक-कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि संगीताच्या माध्यमातून कलाकारांना मानसिक आनंद मिळावा, या उद्देशाने “आपला माणूस गाणी ऑर्केस्ट्रा, कराओके आणि लाईव्ह” यांच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय महंमद रफी, किशोर कुमार, मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत पार पडणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये व सन्मानचिन्ह, मा. श्री. विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष, नगरपरिषद पंढरपूर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी ६ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी विविध मान्यवर व समाजसेवकांचे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेत हिंदी व मराठी भाषेतील कोणतेही गीत सादर करता येणार आहे. स्पर्धकांना कराओके गीत सादरीकरणासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. गुणांकनामध्ये सूर, ताल, लय, शब्दफेक आणि सादरीकरण या बाबींचा विचार केला जाणार आहे. स्पर्धकांनी सोलो किंवा ड्युएट प्रकारातील गीत निवडावे. ड्युएट गीतासाठीही बक्षीस एकच ग्राह्य धरले जाईल. कराओके ट्रॅक संयोजकांकडे पाठविण्याची जबाबदारी स्पर्धकांची राहणार आहे.
स्पर्धकांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास संबंधित गीत बाद करण्यात येईल. स्पर्धकांची संख्या वाढल्यास शनिवारी ऑडिशन घेऊन रविवारी अंतिम स्पर्धा घेण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेची प्रवेशिका दि. १ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार असून, नोंदणी शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले आहे.
नवोदित स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी
स्व. रफी, किशोर कुमार, मुकेश व लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंढरपुरात जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा..
विलास जगधने सर – ९८६०९६६१६४,
श्री. धनंजय कुलकर्णी – ८९५६६२६६३४,
सिंगर चंदू सर – ७०८३७१९२१३,
सिंगर नयन मॅडम, पुणे – ९३५९७००१९५,
श्री. बबन पवार – ९९२२५१५५३३
श्री. अनिल लोकरे – ९९७०२२२६१७ यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या रसिक श्रोत्यांसाठी लकी ड्रॉद्वारे आकर्षक भेटवस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रसिक श्रोत्यांना कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.
ही स्पर्धा श्रीराम मंगल कार्यालय, दूध डेअरी शेजारी, इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
“आपल्यासारख्या कलाकारांमुळेच आपली गाणी, आपली संस्कृती आणि संगीत परंपरा टिकून आहे. याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवोदित गायक-कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजक विलास जगधने सर यांनी केले आहे.
जनता संघर्ष न्यूज सोलापूर
संपादक सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















