
प्रतिनिधी – करजगी,दि. १२ सप्टेंबर, २०२६
शासन परिपत्रकानुसार शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी श्री. बसवराज माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण प्रशाला, करजगी येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. दयानंद उंबरजे, संस्थेचे सचिव तथा करजगी गावचे सरपंच विवेकानंद उंबरजे, उपसरपंच शब्बीर पटेल, संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामपंचायत करजगीचे सर्व सदस्य उपस्थित होते.


प्रशालेचे प्राचार्य एस. बी. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. यावेळी कुमारेश्वर प्रशाला, शावळचे मुख्याध्यापक धनंजय सुतार, त्या प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, श्री. बसवराज प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

“सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान आणि त्यानंतर अन्नदान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजन कार्यक्रमास सर्वांनी मनापासून प्रतिसाद दिला. व्यवसाय शिक्षण विभागातील सहकारी प्राध्यापक लवटे सर यांनी या उपक्रमासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


तसेच कार्यक्रम उत्कृष्ट व नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य एस. बी. बिराजदार, संतोषकुमार उंबरजे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

या स्नेहभोजनाचा आस्वाद प्रशालेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, संस्थेचे पदाधिकारी, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. आपुलकी, स्नेह आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे प्रशाला परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















