
प्रतिनिधी – अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी कुरनूर, कोन्हाळी आणि नाविंदगी या गावांना भेट देऊन खरीप हंगामातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती जाणून घेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांवर संकट ओढवले असून, शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे झालेले नुकसान तसेच सध्याच्या परिस्थितीची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेण्यात आली आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार महोदय, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, शासनाकडून आवश्यक मदत जाहीर करण्यात यावी आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















