
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या देवकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता श्री गणरायाचे भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. यावेळी सहकुटुंब श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा-अर्चना करण्यात आली.
बाप्पाच्या आगमनाने देवकर कुटुंबीयांच्या घरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
यंदाचा गणेशोत्सव भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना, घरच्या घरी विसर्जन तसेच ‘वृक्ष विनायक’ या संकल्पनेअंतर्गत एक गणपतीसोबत एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी केले आहे.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो. प्रत्येकाचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होवो तसेच आपल्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हरित, स्वच्छ आणि सुंदर बनो, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी करण्यात आली.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















