Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून श्री एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 21, 2026
in Crime, solapur`
0
अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून श्री एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर

बेकायदेशीर व विनापरवाना सावकारी केल्याचा खोटा आरोप सोलापूर येथील व्यावसायिक श्री. एम. बी. गायकवाड (रा. न्यु पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्यावर ठेवण्यात आला होता. या खटल्याचा निकाल नुकताच घोषित झाला असून, न्यायालयाने श्री एम. बी. गायकवाड यांची निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे.

न्यायालयाचे  निरीक्षण व निष्कर्ष :-सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. १०)  यांच्या न्यायालयात (नि.फौ.ख.क्र. ७३/२०१७) या प्रकरणाची सुनावणी झाली.बचाव पक्षातर्फे ॲड.श्रीनीवास कटकुर यांचेवतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या उलटतपासणीवरून न्यायालयाने खालील महत्त्वाच्या बाबी नोंदवल्या:

साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती :- सरकारी पक्षाच्या मुख्य फिर्यादी, पंच आणि तपासी अंमलदार यांच्या जबाबात व धाडीच्या तारखांमध्ये मोठी विसंगती आढळून आली.

कायदेशीर त्रुटी:-ज्या घरावर धाड टाकली, ते घर आरोपीच्याच मालकीचे होते हे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही. तसेच घरझडतीचे अधिकृत आदेश अभिलेखावर आणले गेले नाहीत.

 पुराव्याचा अभाव:- जप्त केलेले धनादेश आणि बॉण्ड्स खरोखर अवैध सावकारीसाठी वापरले जात होते हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला. मूळ तक्रारदाराच्या नावाचा कोणताही धनादेश किंवा बॉण्ड आरोपीकडे सापडला नाही.

सरकारी पक्ष आरोपीविरोधातील गुन्हा संशयातीतपणे सिद्ध करू शकला नसल्याने न्यायालयाने श्री एम. बी. गायकवाड यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (१) अन्वये त्यांची सर्व आरोपातून  निर्दोष मुक्तता केली.सदर खटल्यात आरोपी एम. बी. गायकवाड यांच्यातर्फे विधिज्ञ  ॲड.श्रीनिवास. कटकूर व ॲड.आकाक्ष आयंची यांनी काम पाहिले.

Previous Post

धार्मिकतेसोबतच सामाजिक व शैक्षणिक कार्यातही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे योगदान मोलाचे – नाना भाऊ पटोले.

Next Post

बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचा एल्गार; दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचा एल्गार; दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण.

बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचा एल्गार; दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022694

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697