दिव्यांगांना स्वावलंबनाच्या दिशेने नवी संधी; महामंडळाच्या उपक्रमातून रोजगाराला मिळणार चालना
प्रतिनिधी – सोलापूर

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊन आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्यात आले. या रिक्षांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यास मदत होणार असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आधार मिळणार आहे.
या रिक्षा वाटप कार्यक्रमावेळी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मा. डी. एम. गायकवाड साहेब यांच्यासह उत्कर्ष रणसुरे, श्रीकांत चंदनशिवे, ऋषिकेश गायकवाड, गिरीश निंबर्गी, हिरा गायकवाड आणि अमृता जडल मॅडम उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना स्वतःचा रोजगार उभारण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा अशा योजनांचा महत्त्वाचा उद्देश आहे. रिक्षा मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन स्वाभिमानाने जीवन जगण्यास मदत होणार आहे.
दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असून, या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















