
प्रतिनिधी – अक्कलकोट
लिंगायत पंचमसाली समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोट तालुका लिंगायत पंचमसाली समाजाच्या वतीने भव्य पायी मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.
कुडलसंगम पीठाचे प्रथम जगद्गुरू श्री जयबसव मृत्यूंजय महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा प्रियदर्शिनी मंगल कार्यालय येथे पोहोचला.
यानंतर प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात आयोजित जाहीर सभेत पंचमसाली समाजाला ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन समाजाच्या मागणीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, समाजातील ज्येष्ठ नेते व विविध मान्यवर उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















