Sunday, November 22, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य; उत्तर-दक्षिण सोलापुरातील सात शाळांची अचानक तपासणी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 31, 2026
in Eductional, solapur`
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य; उत्तर-दक्षिण सोलापुरातील सात शाळांची अचानक तपासणी.
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोरेगाव शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांचा संवाद; सिंदखेड व सोरेगावच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक, धोकादायक खोल्यांच्या दुरुस्तीचे निर्देश…

प्रतिनिधी – सोलापूर सोलापूर, 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जनहित याचिका क्र. १/२०१८ अंतर्गत जिल्हास्तरावर गठित करण्यात आलेल्या तपासणी समितीने उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या सात शाळांना अचानक भेटी देऊन शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान कुमठे मराठी, कुमठे उर्दू, कुलकर्णी तांडा, मद्रे, सिंदखेड, हत्तूर मराठी मुले, हत्तूर मुली, हत्तूर उर्दू आणि सोरेगाव येथील शाळांची पाहणी करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या तपासणीमध्ये शाळांची स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, विद्यार्थी लाभाच्या योजना, अध्यापन पद्धती आणि प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचा आढावा घेण्यात आला.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261030-WA0041.mp4

सोरेगाव जिल्हा परिषद शाळेत समितीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शासकीय लाभाच्या योजना आणि आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत पालकांची विचारपूस करण्यात आली. यावेळी पालकांनी समाधान व्यक्त केले. समितीने विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही आढावा घेतला.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261030-WA00401.mp4

सिंदखेड व सोरेगाव शाळांमधील इंग्रजी भाषा संवाद उपक्रम, इंग्रजी वाचन, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांची शिस्त, स्काऊट-गाईड उपक्रम, शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी तसेच विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची समितीने विशेष दखल घेत कौतुक केले. शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकसहभागातून करण्यात आलेली शाळांची रंगरंगोटी व शैक्षणिक वातावरण निर्मितीबाबतही समाधान व्यक्त करण्यात आले.

तपासणीदरम्यान मद्रे येथील सात वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असल्याचे, काही वर्गखोल्यांमधील प्लास्टर निघाल्याचे निदर्शनास आले. तसेच हत्तूर, कुलकर्णी तांडा आणि मद्रे येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, काही शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था, कुमठे उर्दू व कुलकर्णी तांडा येथील शाळांमध्ये रॅम्प आणि ग्रीलचा अभाव आढळून आला. बंद व धोकादायक खोल्यांमधील डेड स्टॉक आणि अडगळ तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हत्तूर येथील मुलींच्या शाळेसह इतर शाळांमधील मुली व महिला शिक्षकांच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. हत्तूर उर्दू शाळेतील स्वयंपाकगृहाजवळील भिंतीला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कुमठे मराठी शाळेतील शिक्षकांच्या अनुपस्थिती व उशिरा येण्याबाबत शिक्षण विभागाने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. शिक्षकांच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासही सांगण्यात आले. कुमठे उर्दू शाळेतील परिपाठाचे निरीक्षण करण्यात आले. सर्व शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश समितीने दिले.

या जिल्हास्तरीय तपासणी समितीचे अध्यक्ष तथा माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी, उपजिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार अश्विनी दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी कनिष्ठ अभियंता, पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि हत्तूर केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.

शाळांच्या तपासणीदरम्यान जिल्हा समन्वयक बापूराव जमादार यांनीही राहून शाळांमधील शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

भाड्याच्या जागेतील जिल्हा परिषद शाळांना हक्काची इमारत द्या; DPDC व समग्र शिक्षा अभियानातून निधी उपलब्ध करा!

Next Post

शाळांचा दर्जा उंचावण्यासह आरोग्य सेवा व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला आढावा.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
शाळांचा दर्जा उंचावण्यासह आरोग्य सेवा व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला आढावा.

शाळांचा दर्जा उंचावण्यासह आरोग्य सेवा व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045709

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697