Saturday, November 21, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

अकलूज एसटी डेपोसाठी २० चालक आणि २० वाहक तातडीने द्या; परिवहनमंत्र्यांकडे राजकुमार हिवरकर-पाटील यांची मागणी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 3, 2026
in solapur`
0
अकलूज एसटी डेपोसाठी २० चालक आणि २० वाहक तातडीने द्या; परिवहनमंत्र्यांकडे राजकुमार हिवरकर-पाटील यांची मागणी.
0
SHARES
178
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन; लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.

प्रतिनिधी – सोलापूर 

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर-धाराशिव दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी अकलूज एसटी बस डेपोसाठी २० चालक आणि २० वाहक तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी परिवहनमंत्र्यांना निवेदन सादर केले.

अकलूज बस डेपोअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना नियमित आणि सुरळीत बससेवा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, सध्या डेपोमध्ये चालक आणि वाहकांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध एसटी बसेस नियमितपणे चालविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी काही बसफेऱ्या बंद अथवा कमी झाल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने आणि मागणीनुसार अकलूज बस डेपोसाठी २० नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, बसेस उपलब्ध असूनही पुरेशा चालक व वाहकांअभावी त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नसल्याची बाब हिवरकर-पाटील यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिली.

अकलूज बस डेपोसाठी तातडीने २० चालक आणि २० वाहक उपलब्ध करून दिल्यास बंद पडलेल्या तसेच कमी झालेल्या बसफेऱ्या पुन्हा नियमित करता येतील. त्यामुळे ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांपर्यंत एसटीची सेवा पोहोचण्यास मदत होईल आणि विद्यार्थी, नोकरदारांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली.

या निवेदनाची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने दखल घेत संबंधित मागणीची लवकरच पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती राजकुमार हिवरकर-पाटील यांनी दिली.

मंत्र्यांच्या आश्वासनामुळे अकलूज एसटी डेपोला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, लवकरच लालपरी पुन्हा शहरापासून ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांपर्यंत नियमित धावताना दिसेल, अशी आशा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

वंचितांसोबत दिवाळी साजरी करणार पत्रकार सुरक्षा समिती; नऊ वर्षांची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम!

Next Post

सोलापूर बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून झाडाझडती; स्वच्छतेसह सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सोलापूर बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून झाडाझडती; स्वच्छतेसह सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

सोलापूर बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून झाडाझडती; स्वच्छतेसह सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आज...

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन; कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील व हार्डवेअर साहित्याची सुविधा करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील...

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

by Janta Sangharsh News
November 11, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील तब्बल ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या...

Load More

वेबसाईट दर्शक

0044989

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697