Saturday, November 21, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूर बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून झाडाझडती; स्वच्छतेसह सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 3, 2026
in solapur`
0
सोलापूर बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून झाडाझडती; स्वच्छतेसह सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी एसटी महामंडळाने बसस्थानकांमधील मूलभूत सुविधांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात यापूर्वीच्या तुलनेत स्वच्छतेत काही सुधारणा झाल्याचे दिसून येत असले, तरी आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेसह पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर प्रवासी सुविधांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच बसस्थानक परिसरातील स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. काही प्रमाणात सुधारणा झाल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच स्वच्छतेच्या बाबतीत अधिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बसस्थानक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रवाशांशी थेट संवाद साधत जाणून घेतल्या समस्या

बसस्थानकाच्या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. एसटी महामंडळाच्या नवीन बसगाड्यांबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मात्र, चांगल्या बसगाड्यांसोबतच बसस्थानकातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधाही दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी दोन प्रमुख शहरांदरम्यान विनावाहक बससेवा सुरू करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात आली. प्रवाशांच्या सूचनांची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीसोबतच प्रत्यक्ष अंमलबजावणीही महत्त्वाची!

बसस्थानकाची पाहणी करून सूचना देण्याबरोबरच त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता, बसस्थानक परिसराची निगा आणि प्रवाशांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण याकडे प्रशासनाने सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रवाशांचे समाधान हेच एसटी महामंडळाच्या सेवेचे महत्त्वाचे मापदंड असले पाहिजे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणी समजून घेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर

संपादक -सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

अकलूज एसटी डेपोसाठी २० चालक आणि २० वाहक तातडीने द्या; परिवहनमंत्र्यांकडे राजकुमार हिवरकर-पाटील यांची मागणी.

Next Post

दुबईत उद्योजकीय भरारी, सोलापुरात १५ वर्षांपासून आरोग्यसेवेचा वसा! – आयुब खान.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
दुबईत उद्योजकीय भरारी, सोलापुरात १५ वर्षांपासून आरोग्यसेवेचा वसा! – आयुब खान.

दुबईत उद्योजकीय भरारी, सोलापुरात १५ वर्षांपासून आरोग्यसेवेचा वसा! - आयुब खान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आज...

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन; कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील व हार्डवेअर साहित्याची सुविधा करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील...

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

by Janta Sangharsh News
November 11, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील तब्बल ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या...

Load More

वेबसाईट दर्शक

0044989

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697