आयुब खान यांची सामाजिक बांधिलकी; परदेशात व्यवसाय उभारण्यासाठी मराठी तरुणांनाही मार्गदर्शन.

प्रतिनिधी – सोलापूर
जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार करताना आपल्या मातीशी असलेले नाते जपणे, हीच खऱ्या यशाची ओळख आहे. दुबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे आयुब खान यांनी गेल्या १५ वर्षांपासून सोलापुरात मोफत रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबिरांचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. व्यावसायिक यशाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या त्यांच्या या कार्याची सोलापूरमध्ये विशेष चर्चा होत आहे.
दुबईत वास्तव्यास असलेले आयुब खान हे ‘ग्लोबल इंटरप्रिन्योर कन्सल्टंट्स’ या व्यासपीठाशी जोडलेले असून आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वतःचा व्यवसाय विस्तारतानाच महाराष्ट्रातील तरुणांना परदेशात उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यावरही त्यांचा भर आहे. मराठी तरुणांनी जागतिक बाजारपेठेतील संधी ओळखून उद्योजकतेकडे वळावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
विशेष म्हणजे, परदेशात व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांनी सोलापूरशी असलेली नाळ कायम जपली आहे. गेल्या दीड दशकापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांचे वेळीच निदान व्हावे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
दुबईत विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आयुब खान यांनी व्यावसायिक प्रगतीसोबतच सामाजिक कार्यालाही प्राधान्य दिले आहे. परदेशात यश मिळवूनही आपल्या शहरातील नागरिकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आयुब खान यांच्यासह जगदीश दिद्दी, डॉ. पंजाब कत्ते आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजकीय संधी निर्माण करताना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवेचा उपक्रम सातत्याने राबविणारा आयुब खान यांचा प्रवास नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – 9579838240
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















