लालबावटा जनरल कामगार युनियन व शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा पुढाकार; मुख्याधिकारी कुशल जैन यांना निवेदन…

प्रतिनिधी – सोलापूर
अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आयटक संलग्न लालबावटा जनरल कामगार युनियन व शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
दिवाळी बोनस व गणवेशासाठी १,५०० रुपयांची तरतूद, दरमहा १० तारखेपूर्वी वेतन, ६० वर्षांपुढील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन, विविध प्रकारच्या रजा, प्रवास भत्ता, अतिरिक्त कामाचा मोबदला, सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे तसेच १४ मे २०२४ च्या आदेशानुसार कामाचे नियोजन करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कुशल जैन यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांवर सामंजस्याने तोडगा काढण्याबाबत त्यांनी सकारात्मक विश्वास दर्शविला.
यावेळी प्रा. राजेंद्र करली, प्रवीण मस्तुद, अध्यक्ष तानाजी ठोंबरे, यशवंत फडतरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















