Saturday, November 21, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांचे निर्देश!

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
November 6, 2026
in solapur`
0
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांचे निर्देश!
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गावनिहाय नाल्यांची माहिती संकलित करून जलसंधारणाच्या कामांना गती द्या; जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांवरही लक्ष केंद्रित.

प्रतिनिधी – सोलापूर

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांचे प्रभावी नियोजन करावे. प्रत्येक गावातील नाल्यांची सविस्तर माहिती संकलित करून जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत किरकोळ अडचणींमुळे पाणीपुरवठा सुरू होऊ शकत नसलेल्या योजनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सभापती दीपक वैद्य यांनी दिले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, जलसंधारण योजनांची दुरुस्ती आणि गावनिहाय नाल्यांची माहिती संकलित करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, जल व्यवस्थापन समितीचे सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती, गीतांजली साळुंखे, शनमुखी कोरके, रश्मी हिप्परगी, वंदना कांबळे आदी उपस्थित होते.

तसेच समितीचे सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयेश हेडगिरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांची उपस्थिती होती.

गावनिहाय नाल्यांची माहिती संकलित करणार

जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यांची सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. जलसंधारण विभागातील संबंधित उपअभियंत्यांनी ही माहिती तयार करून संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणावी, असे अध्यक्षांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) यांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज पोर्टल’चा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिल्या. या पोर्टलमुळे गावातील जलस्रोतांची माहिती उपलब्ध होऊन जलसंधारणाच्या कामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

पाणीटंचाईच्या काळात शेतीसाठी सिंचनाची उपलब्धता कायम राहणे आवश्यक आहे. महावितरण विभागाकडील विद्युत रोहित्र (डीपी) नादुरुस्त झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. शेतकऱ्यांना विद्युत पंपाद्वारे सिंचन करताना अडचणी येऊ नयेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही दीपक वैद्य यांनी दिल्या.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना, जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी आणि पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष कार्यक्षमता यावर भर देण्यात आला. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व तत्परतेने काम करावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

महिला बचत गटांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन; फिरता निधी, थकीत मानधन व कर्जावरील सबसिडीची मागणी!

Next Post

जेऊर गावचा सुपुत्र बंदेनवाज कोरबू यांचा भाविकांसाठी पुढाकार; काशिलिंग यात्रेत मोफत पाणीसेवा देणार!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
जेऊर गावचा सुपुत्र बंदेनवाज कोरबू यांचा भाविकांसाठी पुढाकार; काशिलिंग यात्रेत मोफत पाणीसेवा देणार!

जेऊर गावचा सुपुत्र बंदेनवाज कोरबू यांचा भाविकांसाठी पुढाकार; काशिलिंग यात्रेत मोफत पाणीसेवा देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

हक्काच्या घरासाठी पत्रकार रस्त्यावर; घरकुल मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आज...

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचा दिमाखात शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन; कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील व हार्डवेअर साहित्याची सुविधा करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील...

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले; महापौरांच्या हस्तक्षेपानंतर बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार?

by Janta Sangharsh News
November 11, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील तब्बल ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या...

Load More

वेबसाईट दर्शक

0044989

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697