
प्रतिनिधी – जेऊर(अक्कलकोट)
गावातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता श्री काशिलिंग यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी जेऊर गावचे सुपुत्र बंदेनवाज कोरबू यांनी पुढाकार घेतला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
यासोबतच ग्रामपंचायत जेऊर प्रशासनाला त्यांनी विशेष विनंती केली आहे की, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
तसेच जेऊर ते अक्कलकोट रोड, तडवळ रोड, स्टेशन रोड आणि सोलापूर रोडवरील सर्व विद्युत खांबांवर दिवाबत्तीची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यामुळे शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांसह रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.
“मी जेऊर गावचा सुपुत्र म्हणून गावाच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. भाविकांची सेवा हीच माझ्यासाठी समाधानाची बाब आहे,” अशी भावना बंदेनवाज कोरबू यांनी व्यक्त केली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















