एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिवाळी शिधा वाटप; पशुधनासाठी मोफत पाणीसेवा आणि शेतकरी सेवा केंद्राचा उपक्रम.

प्रतिनिधी – माळशिरस
माळशिरस तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचे उपक्रम हाती घेण्यात आले असून, ‘मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण’ या संकल्पनेतून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमांची माहिती देण्यासाठी तसेच शेतकरी हिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे या शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नातेपुते येथील शिवसेना भवन येथे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या दिवाळी शिधा वाटप उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा दिवाळी शिधा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या पत्नींना वितरित करण्यात येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
याशिवाय पशुधनासाठी मोफत पाणी वाटप तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शेतकरी सेवा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचीही माहिती यावेळी दिली जाणार आहे.
या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : शिवसेना भवन, पुणे-पंढरपूर रोड, नातेपुते.
वेळ : सकाळी ११.०० वाजता.
आयोजक : श्री.राजकुमार हिवरकर-पाटील
शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख (ओबीसी), चेअरमन – राजगड नॉलेज सिटी व राजगड पतसंस्था, नातेपुते तथा शिवसेना, माळशिरस तालुका.















