Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 29, 2026
in Akkalkot
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी-अक्कलकोट 

“अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त”, “सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय”, “श्री अन्नपूर्णा देवी” आणि “श्री लक्ष्मीनारायण” यांच्या जयघोषात श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा महोत्सव बुधवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. राज्यासह परराज्य तसेच विदेशातून आलेल्या लाखो स्वामीभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260729-WA0037.mp4

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला. संपूर्ण अन्नछत्र परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटला होता. भाविकांच्या सोयीसाठी महाप्रसाद, निवास, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260729-WA0035.mp4

गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, गुरूपूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शेखर निकम, शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260729-WA0037-1.mp4

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त मंडळ, सेवेकरी, क्रियाशील सभासद, विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच शेकडो स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260729-WA0033.mp4

गेल्या दहा दिवसांपासून धर्मसंकीर्तन, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे गुरुपौर्णिमा महोत्सवाला भक्तिमय वातावरण लाभले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाखो भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाचे विशेष नियोजन करण्यात आले. विधिवत पूजा मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वंभर पुजारी, संजय कुलकर्णी आणि सोमकांत कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन सचिव शामराव मोरे यांनी केले.

वर्षभरात ५ हजार भक्तांनी केले रक्तदान

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित विविध रक्तदान शिबिरांमध्ये गेल्या ३६० दिवसांत सुमारे ५ हजार स्वामीभक्तांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.

चोख पोलीस बंदोबस्त

गुरुपौर्णिमा आणि वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एकनाथ पवार यांनी मंदिर आणि अन्नछत्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

वाहतूक व पार्किंगचे उत्कृष्ट नियोजन

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन न्यासाने वाहतूक आणि पार्किंगचे सुयोग्य नियोजन केले. मैंदर्गी रस्त्यावरील प्रवेश व निर्गमन व्यवस्था स्वतंत्र करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत राहिली आणि भाविकांना कोणतीही गैरसोय झाली नाही.

लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज दोन्ही वेळा मोफत महाप्रसाद दिला जातो. दररोज २५ हजारांहून अधिक भाविक, तर गुरुपौर्णिमा, गुरुवार, एकादशी आणि संकष्टीसारख्या विशेष दिवशी एक लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

सातासमुद्रापार पोहोचले अन्नछत्र मंडळाचे कार्य

महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, उत्तराखंड तसेच विदेशातून आलेल्या स्वामीभक्तांनी गुरुपौर्णिमा व वर्धापन दिनानिमित्त अन्नछत्र मंडळाला भेट देत श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

६० कोटींचे अत्याधुनिक महाप्रसादगृह उभारणीच्या मार्गावर

अन्नछत्र मंडळाच्या नव्या महाप्रसादगृहाचे बांधकाम वेगाने सुरू असून सध्या तिसऱ्या मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे १ लाख १९ हजार ३९८ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या वातानुकूलित इमारतीवर ५१ फूट उंच श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. एकावेळी २,५०० भाविकांसाठी भोजन व्यवस्था, ५ हजार भाविकांसाठी प्रतीक्षागृह, आधुनिक स्वयंपाकगृह, चपाती मशिन्स, डिश वॉशर, धान्य कोठार आणि अग्निशामन यंत्रणा अशा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ६० कोटी रुपये आहे.

समाजोपयोगी उपक्रमही उल्लेखनीय

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून समर्थ महाप्रसाद सेवा, कुस्तीगिरांसाठी खुराक योजना, रक्तदान शिबिरे यांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. यंदाच्या पंढरपूर वारीदरम्यान पोलिसांसाठी अन्नधान्य, उपवासाचे साहित्य आणि पिण्याच्या पाण्याचे ५०० जार उपलब्ध करून देत मंडळाने समाजसेवेचा आणखी एक आदर्श निर्माण केला.

Previous Post

राज्य मागासवर्गीय आयोगाला भारतीय काँग्रेसचे निवेदन; जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी तातडीने कार्यवाहीची मागणी.

Next Post

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी.

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022729

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697