Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 30, 2026
in Akkalkot
0
श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी.
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा आणि श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामी दर्शनास भाविक विशेष महत्व देतात. दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. पहाटे ४ वाजता समितीचे चेअरमन महेश इंगळे व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260730-WA00041.mp4

तत्पूर्वी भाविकांच्या गर्दीमुळे रात्री २ वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले होते. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरेकेटींग करून करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता श्रींची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे, पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

तदनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या झालेल्या गर्दीमुळे मंदीरातील पुरुष व महिला भाविकांना वेगवेगळ्या स्वतंत्र दर्शन रांगेतून आरतीनंतर टप्या टफ्याने दर्शनास सोडण्यात येत होते. पुरुष व महिला भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलीस बंदोबस्त, वाहतुक पोलीस बंदोबस्त, बॅरेकेटींग दर्शन रांग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर इत्यादी सुविधांच्या माध्यमातून सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ घेता आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता. गुरुपौर्णिमेनिमीत्त मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे भोजन महाप्रसादाचे आयोजन सालाबादा प्रमाणे देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले होते. अनेक स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरूपौर्णिमेनिमीत्त आज श्रींच्या नैवेद्य आरतीस उपस्थित राहून विद्यमान आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उद्योजक राणा सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, उद्योजक स्वामीभक्त अजीत सामंत, प्रशांत जोशी, देवदत्त गौडा आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.

सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, संतोष पराणे, महेश मस्कले, रमेश शिंदे, सागर गोंडाळ, लखन सुरवसे, आकाश चुंगीकर आदीसह देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त श्री तारा माता प्राथमिक शाळेत भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
आषाढी एकादशीनिमित्त श्री तारा माता प्राथमिक शाळेत भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात.

आषाढी एकादशीनिमित्त श्री तारा माता प्राथमिक शाळेत भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर जोहार क्रांती सेनेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक (PSI) मा.रतिकांत चंद्रकांत कोळी यांचा भव्य सत्कार करून...

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जोहार कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब भंडारे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा व शहरातील विविध...

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

Load More

वेबसाईट दर्शक

0007172

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697