
अंत्रोळी (प्रतिनिधी)
विनोबा ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नन्हे सितारे’ जिल्हास्तरीय कविता सादरीकरण स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. श्रावणी सिद्धनाथ माने हिने उत्कृष्ट कविता सादर करत दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या उल्लेखनीय यशासाठी तिला वर्गशिक्षिका कीर्ती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रावणीच्या या यशाबद्दल शिक्षण अधिकारी कादर शेख साहेब, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार मॅडम, केंद्रप्रमुख राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक युवराज राठोड, श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाणे, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे तसेच उपाध्यक्ष नामदेव सुपेकर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कु. श्रावणी माने हिला भेटवस्तू देऊन तिच्या यशाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनीच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.















