
प्रतिनिधी -वडाळा, ता. उत्तर सोलापूर
शिवसेनेच्या वतीने आणि मा. श्री. रजकुमार हिवरकर-पाटील यांच्या विशेष सहकार्याने महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ५० टक्के सवलतीच्या दरात शिवलाई मशीन वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नाव नोंदणी सुरू असून परिसरातील महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमात हात शिवण मशीन तसेच पिको-फॉल शिवण मशीन सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक लाभार्थींनी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. मशीनवर सहा महिन्यांची वॉरंटीही देण्यात येणार आहे.हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता, विठ्ठल मंगल कार्यालय, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे आयोजन सौ. उमा नागेश अक्कलकोटकर-माळी (शिवसेना जिल्हाप्रमुख, ओबीसी) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ८८५५९८९८६३ किंवा ९८५०२०१६३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
















