Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

‘सोलापुरी चादरी’चा गौरव थेट पंतप्रधानांकडे; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची मागणी, टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्याची मोदींची ग्वाही.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 8, 2026
in political, solapur`
0
‘सोलापुरी चादरी’चा गौरव थेट पंतप्रधानांकडे; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची मागणी, टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्याची मोदींची ग्वाही.
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘नवी दिल्ली / सोलापूर – प्रतिनिधी

राष्ट्रीय हातमाग दिनाच्या औचित्याने राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरची जागतिक ओळख असलेल्या हातमाग परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीने सोलापूरच्या हातमाग उद्योगाची परंपरा, कौशल्य आणि सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर विशेष अधोरेखित करण्यात आले. एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी आयोजित विशेष अल्पोपहार कार्यक्रमात डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधानांना ही अनोखी भेट सुपूर्द केली. सोलापुरी चादरीवरील स्वतःची प्रतिमा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अप्रतिम कलाकृतीचे आणि सोलापूरच्या हातमाग परंपरेचे मनापासून कौतुक केले सोलापूरच्या विणकरांनी जपलेले कौशल्य हे देशाची अमूल्य परंपरा असल्याचे सांगत, सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला नवउर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक पावले उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सोलापुरी चादरीचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष धोरण आखावे, अशी ठाम मागणी केली. सोलापुरी चादरीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला नवी चालना मिळेल, हजारो हातमाग कामगार, विणकर, लघुउद्योजक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. सोलापुरी चादर हा केवळ एक उत्पादन नसून सोलापूरच्या अस्मितेचा आणि श्रमसंस्कृतीचा जागतिक ब्रँड आहे, असेही त्यांनी नमूद केले संवादादरम्यान डॉ. वाघमारे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत इंग्रजी विषयात पीएच.डी. पूर्ण केल्याचा संघर्षमय प्रवास पंतप्रधानांसमोर मांडला. गरीब कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीतील एका दलित मुलीला शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवून देशसेवेची संधी दिली, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आपण राहत असलेल्या भागाचे नावही मोदी परिसर असल्याचा रंजक उल्लेख त्यांनी यावेळी केला. डॉ. वाघमारे यांच्या संघर्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रतीही सद्भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नवीन तसेच एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, सोलापुरी चादरला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणे ही माझी प्राथमिकता आहे. सोलापूरच्या हातमाग आणि टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी मिळावी, प्रत्येक विणकराच्या हाताला काम मिळावे आणि सोलापूर पुन्हा वस्त्रोद्योगाची राजधानी म्हणून देशभरात उभे राहावे, यासाठी मी संसदेत आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित आणि कामगारांच्या विकासासाठी अधिक ताकदीने काम करत राहणार आहे.

जनता संघर्ष न्यूज सोलापूर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Previous Post

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; वडाळ्यात २,५०० हून अधिक शिलाई मशीनचे वाटप, ५०० महिलांना थेट लाभ .

Next Post

आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) यांचा पत्रकार कृती समितीतर्फे सत्कार.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) यांचा पत्रकार कृती समितीतर्फे सत्कार.

आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) यांचा पत्रकार कृती समितीतर्फे सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

Load More

वेबसाईट दर्शक

0022753

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697