
प्रतिनिधी -सोलापूर
नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात आणि ध्वजरोहण सकाळी ठीक आठ वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या उपस्थितीत सुरु झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.सुदर्शन चक्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, शाळेचे मार्गदर्शिका मीना पारखे, ज्यु कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत आणि झेंडा गीताने संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन केले. यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे तसेच स्वातंत्र्यलढ्यावरील देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती देत स्वातंत्र्याचे महत्त्व आणि संविधानाची महती सांगितली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. चक्रे आपल्या मनोगतात म्हणाले देशाची प्रगती ही तुमच्या शिक्षणावर आणि संस्कारांवर अवलंबून आहे. आजच्या दिवशी देशासाठी एक चांगला नागरिक बनण्याचा संकल्प करा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रांजली ढगे यांनी केले.
शेवटी सर्वांना मिठाई वाटप करून उत्साहात सोहळ्याची सांगता झाली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















