Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 17, 2026
in Eductional, solapur`
0
जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर

श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभागप्रमुख विभावरी रणदिवे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष नागरसे, राजेश मोहोळकर व सचिन मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी राष्ट्रीय प्रतिज्ञेचे वाचन केले. प्रणिल माणिकशेटे यांनी संविधान वाचन, सागर शहा यांनी ‘असाक्षरमुक्त गाव’ प्रतिज्ञा, तर तृप्ती दुर्गे यांनी ‘व्यसनमुक्त विद्यार्थी’ प्रतिज्ञेचे वाचन केले. त्यानंतर पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “तंत्रज्ञानाच्या युगात देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. महाराष्ट्राला शंभर टक्के साक्षर करण्याबरोबरच स्वच्छ, सुंदर आणि निर्व्यसनी भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.”स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेतील सरस्वती गाईड पथकातील विद्यार्थिनींनी शानदार संचलन केले. संचलनाचे नेतृत्व अन्विता बाबरे, शरण्या शिंदे व औदुंबरी पोतदार यांनी केले. त्यांना गाईड कॅप्टन तृप्ती माणिकशेटे व स्काऊटर प्रसन्न काटकर यांनी मार्गदर्शन केले.

क्रीडा विभागप्रमुख संजय पंडित व क्रीडाशिक्षक सुभाष उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर विविध कवायतींचे शानदार सादरीकरण केले. तसेच भार्गवी बोडा, दीप्ती हावळे, यशश्री हलकुडे, संध्या सिरसट, रिया शिंदे, वैष्णवी शिंदे, संध्या मदुरे व साक्षी भागवत या विद्यार्थिनींनी तृप्ती दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली समूहनृत्य सादर केले. त्यांना विद्यार्थी शिक्षिका शीतल स्वामी यांनी सहकार्य केले.प्राथमिक विभागातील सम्राट सुरवसे व पायल कोराडे, तसेच प्रशाला विभागातील शिवण्या स्वामी, विवान वांढरे व समृद्धी वाडकर यांनी खुमासदार शैलीत देशभक्तीपर भाषणे केली. वैभवी वांढरे हिने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी प्रशालेतील राष्ट्रपती गाईड पुरस्कारप्राप्त काजल करपेकर तसेच राज्यपाल गाईड पुरस्कारप्राप्त कांची हजारे, अनुष्का पाटील, अदिती पाटील, नम्रता मोहिते, काव्या पाटील व भूमी शहा या गाईड विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खोबरे यांनी केले, तर विकास शिळ्ळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘देशभक्ती, शिस्त, साक्षरता आणि व्यसनमुक्तीचा संकल्प’ या संदेशाने स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.

Previous Post

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

Next Post

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022699

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697